ओटवणे (प्रतिनिधी ) सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाच्यावतीने उद्या बुधवारी ४ सप्टेंबर रोजी ओटवणे प्राथमिक उपकेंद्रात सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत ६० वर्षांवरील जेष्ठ नागरीकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तपासणी केल्यानंतर सर्वांना स्वास्थ रक्षा किंवा आयुरक्षा किट मोफत देण्यात येणार आहे. तसेच नेत्र रोग तज्ञ डॉ विशाल पाटील उपस्थितांच्या डोळ्यांची तपासणी करणार आहेत. याचा लाभ जेष्ठ व्यक्तींनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.












