खेड(प्रतिनिधी)क्रेडीट कार्ड बाबत खोटी माहिती सांगून एका अज्ञात भामटयाने मोबाईल द्वारे तालुक्यातील पीर लोटे येथील ६० वर्षीय वृद्धाची १ लाख ५४ हजारांची ऑनलाइन फसवनुक केल्या प्रकरणी येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार ३१ ऑगस्ट रोजी घडला होता
यशवंत यल्लोजीराव सोंगाडी वय ६० वर्षे असे त्या फसवूनक झालेल्या वृद्धाचे नाव आहे फिर्यादी हे राहते घरी असताना एका निनावी मोबा. क्रमांका वरुन फिर्यादी यांचा मोबाईल. नंबर वर कॉल आला की, तुमचा क्रेडीट कार्ड इंटर नॅशनल झाला असून त्यासाठी तुम्हाला दरमहा ६५०० रुपये एवढी रक्कम भरावी लागणार असे खोटे सांगून फिर्यादी च फिर्यादी यांच्या मुलीच्या अकाउंटमधील रक्कम टप्प्या-टप्प्याने कपात झालेली असल्याने फिर्यादी यांची अनोळखी इसमांनी १,५४,१११.६१ रूपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे










