आमचे पॅनल सर्वच्या सर्व १५ जागा काबीज करणार

 

भाग्यलक्ष्मी सहकार पॅनल प्रमुख राजन कोरगावकर यांनी व्यक्त केला विश्वास

सिंधुनगरी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची सिंधुदुर्गची पंचवार्षिक निवडणूक होत असून यामध्ये सत्ताधारी भाग्यलक्ष्मी सहकार पॅनलने सर्वच्या सर्व १५ जागांवर विजयी होईल, असा विश्वास पॅनलप्रमुख राजन कोरगावकर यांनी व्यक्त केला. ते आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.भाग्यलक्ष्मी सहकार पॅनल या निडणुकीसाठी पूर्ण ताकदीनिशी उतरले असून सर्वच्या सर्व १५ जागांवर आपले पॅनल जिंकून येईल, असा विश्वास राजन कोरगावकर यांनी व्यक्त केला. मागील २२ वर्षात आमच्या पॅनलने जी विश्वासार्हता निर्माण केली आहे. त्यामुळे विरोधक आमच्यावर एकाधिकारशाहीचा जो आरोप लावीत आहेत, तो पूर्णतः बिनबुडाचा आहे. विरोधी पक्षाचे प्रमुख मालवणचे असून ते काही वर्षांपूर्वी भाग्यलक्ष्मी सहकार पॅनलबरोबर होते. त्यांना सत्तेची सर्व पदे मिळाली असून जर एकाधिकारशाही असती तर आमच्या पॅनलला २२ वर्षे सत्ता दिली नसती, अशी टिपण्णी सुद्धा कोरगावकर यांनी केली.

आमच्या पॅनलमध्ये विश्वासार्हता

विरोधक केवळ १ मत मागत आहेत. यातूनच सर्व काही स्पष्ट होते. आमच्या पॅनलमध्ये विश्वासार्हता असल्याने सर्व १५ जागा जिंकू, असा विश्वास पॅनलप्रमुख राजन कोरगावकर यांनी व्यक्त केला. आमचे पॅनल शिक्षकांच्या प्रश्नांबाबत बांधील आहोत. सर्व शिक्षकांचा आमच्या पॅनलवर विश्वास आहे. आम्ही आजवर शिक्षणकांबरोबर अर्थपूर्ण व्यवहार केलेला नाही. त्यामुळे आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा टोला सुद्धा कोरगावकर यांनी विरोधकांना लगावला.

आंतरजिल्हा बदलीबाबत विरोधकांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू

आंतरजिल्हा बदलीबाबत विरोधकांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू ती मते त्यांना मिळणार नाहीत, असेही कोरगावकर यावेळी म्हणाले.
तर विरोधी पॅनल आमची कॉपी करीत असून आमच्या पत्रके, पोस्टर, जाहीरनामा याची कॉपी केली आहे. मुळात सहकरमध्ये काम करताना धोरणे राबवावित लागतात. पण या विरोधी पॅनलने केवळ आश्वासनांची खैरात केली आहे, अशी टीका कोरगावकर यांनी केली.

आमचा कारभार पारदर्शक
यावेळी कोरगावकर म्हणाले की, आमचा आजवरचा कारभार पारदर्शक असून विकासाभिमुख आहे. मुख्य म्हणजे विरोधकांमध्ये एकवाक्यता नसल्याने त्यांचा पराभव अटळ आहे. मुख्य म्हणजे विरोधकांकडे उमेदवार सुद्धा नव्हते. वेंगुर्ले तालुक्यातून डमी उमेदवार उभा करण्याची नामुष्की विरोधकांवर आली. यातून सर्व काही स्पष्ट होते.
दोडामार्गमधील अपहार मुद्दा आमच्या पॅनलने उघडकीस आणला. तर तत्कालीन संचालकांच्या दोन प्रॉपर्टी सुद्धा जप्त केल्या आहेत. यातून सर्व स्पष्ट होते.
भाग्यलक्ष्मी पॅनलची बाजू जमेची असून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ३ वेळा बैठक झाली. पण विरोधक ठाम राहिले. तरीही आमच्या पॅनलचा विजय निश्चित आहे, असे पॅनलप्रमुख राजन कोरगावकर यांनी म्हटले.
यावेळी राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक सुहास सावंत, केंद्रप्रमुख सभा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विजय भोगले, राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस सचिन मदने, जिल्हाध्यक्ष नारायण नाईक, दिलीप मस्के,भालचंद्र जोईल,
आदी उपस्थित होते.