पाचल गुरववाडी ते केदारलिंग मंदिर रस्ता डांबरीकरण कामाचा भाजपा जिल्हा सरचिटणीस रविंद्र नागरेकर यांच्या हस्ते शुभारंभ

राजापूर (वार्ताहर): रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हयाचे खासदार नारायण राणे यांच्या फंडातून निधी मंजूर झालेल्या तालुक्यातील पाचल गुरववाडी ते केदारलिंग मंदिर रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ भाजपा जिल्हा सरचिटणीस रविंद्र नागरेकर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला.
सुमारे आठशे मीटर या रस्ताच्या डांबरीकरणासाठी आठ लाख रूपये निधी मंजूर झाला आहे. गेली अनेक वर्षांपासून हा रस्ता डांबरीकरण व्हावा अशी येथील ग्रामस्थांची मागणी होती. या कामी भाजपा उपाध्यक्ष समीर खानविलकर यांनी सातत्याने पाठपुरावा करून नाम. नारायण राणे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला आहे.

 

यावेळी भाजपा राजापूर तालुका पुर्व विभाग अध्यक्ष भास्कर सुतार, उपाध्यक्ष समीर खानविलकर, भाजपा युवक तालुकाध्यक्ष अरविंद लांजेकर, शहर अध्यक्ष राजू चव्हाण, बुथ अध्यक्ष अभय धावडे, भूषण गुरव, जयंत धावडे, वाडी अध्यक्ष नथुराम गुरव, गावकर एकनाथ गुरव, गणेश गुरव, महेश गुरव, राजराम गुरव, बंधु गुरव, रघुनाथ गुरव, मनोहर गुरव, मधुकर गुरव, विशाल गुरव, विजय गुरव, अनंत गुरव, अशोक गुरव, सतिश गुरव, पप्या गुरव, अमोल गुरव, प्रकाश धावडे, पांडुरंग धावडे, संदेश धावडे, शाताराम धावडे आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थीत होते.

 

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस रविंद्र नागरेकर यांनी येथील ग्रामस्थांना निवडणुकीपुर्वी जे विकास कामांचे शब्द दिले होते. त्याची पुर्तता नाम. राणे यांनी या कामाच्या माध्यमातून केलेली आहे. तर याच भागातील पाचल बौध्दवाडी ते धावडेवाडी यांना जोडणाऱ्या नदीवर पुल बांधणेकामी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे या भागातील दळवणाची होणारी गैरसोय दूर होईल. त्यामुळे आपण सर्वांनी या भागातील भाजपाचे पदाधिकारी यांच्या पाठीशी संघटीतपणे राहून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी परिश्रम घेतले पाहिजे. या भागातील जी काही विकासाची कामे असतील ती पक्षाच्या माध्यमातून तसेच नाम. राणे यांच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन श्री. नागरेकर यांनी दिले.