खेड(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे गृहराज्य मंत्री तथा दापोली मतदारसंघाचे आमदार श्री.योगेश दादा कदम ह्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन तालुक्यातील अनेक मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.
यामध्ये प्रामुख्याने सुजाता सखाराम कदम, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चाटव ग्रामपंचायत, दीप्ती शिगवण माजी नगरसेविका, पुष्पेन दिवटे जिल्हाध्यक्ष मनविसे, प्रसाद शेट्ये तालुका अध्यक्ष मनविसे, रोहन भोजने उपशहर अध्यक्ष मनसे, राजू आंब्रे उप शहर अध्यक्ष मनसे, विनय माळी, सांस्कृतिक जिल्हाध्यक्ष, नमिता माळी, दत्ता शिगवण, सिद्धु शिगवण, राजेंद्र चिखले, संजय जड्याळ, सचिन जड्याळ, चैत्यन आवटे व नचिकेत खेडेकर यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्य मंत्री तथा दापोली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री.योगेश दादा कदम हे उपस्थित राहुन या सर्वांचे पक्षात स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.












