सातगाव बौद्ध समाज सेवा संघ स्थानिक आणि मुंबई तर्फे २२ ते २४ दरम्यान आंबडस-चिरणी फाटा येथे क्रिकेट स्पर्धा

चिपळूण (प्रतिनिधी):-– खेड तालुका बौद्ध समाजसेवा अंतर्गत सातगाव बौद्ध समाजसेवा संघ स्थानिक आणि मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा दिनांक २२ ते २४ फेब्रुवारीदरम्यान आंबडस-चिरणी फाटा येथील मैदानात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्या उपविजेत्या, तृतीय व चतुर्थ संघास रोख बक्षीस आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

 

खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ अंतर्गत सातगाव बौद्ध समाज सेवा संघ ( आंबडस, लोटे, चिरणी, काडवली, केळणे, भेलसई, शेल्डी) या सामाजिक संघटनेतर्फे समाजोपयोगी उपक्रम तसेच क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून खेळाडूंच्या कलागुणांना वाव दिला जातो.

 

 

या अनुषंगाने यावर्षी भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघास २५ हजार रुपये, उपविजेत्या संघास १५ हजार रुपये, तृतीय क्रमांक संघास ६ हजार रुपये व चतुर्थ क्रमांक संघास ४ हजार रुपये रोख व प्रत्येकी संघास आकर्षक चषक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात येणार आहे. याचबरोबर वैयक्तिक पारितोषिके देखील ठेवण्यात आले आहेत. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक खेळाडूस आकर्षक चषक आणि टीशर्ट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी २ हजार ५०० रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली आहे. तरी सातगाव बौद्ध समाज सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

संपर्क क्रमांक:–

 

सुधीर हळदे (अध्यक्ष) ९९२२१९८७५८

विजय हळदे (उपाध्यक्ष) ७८७५७१७१०२

निलेश तांबे (सरचिटणीस)

७७२०९०७२९९

विनोद कदम (खजिनदार)

७२१८१७११६०