पाली, (वार्ताहर) शिवराय ग्रुप अकोला यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५१ राज्याभिषेक सोहळ्या निमित्ताने अकोल्यातून रायगड किल्ल्यावर मानाची पालखी निघते. मंगळवारी (ता. 3) अकोल्यातून या पालखीचे पूजन करून वाजतगाजत व महाराजांच्या जयघोष करत शोभायात्रा काढण्यात आली होती. या सोहळ्यात 300 शिवभक्त खासगी लक्झरी बसद्वारे रायगडाकडे रवाना झाले.

बुधवारी (ता. 4) ही पालखी वढु बुद्रुक येथे होती. गुरुवारी (ता. 5) ही पालखी पहाटे पाली मध्ये आली. जेष्ठ गिर्यारोहक श्री प्रजपाती बोधने यांनी पालखीत सहभागी शिवभक्तांना मार्गदर्शन केले.श्री राजेश मापारा (महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य, भा.ज.प) यांनी पालखीचे न्याहरी नियोजन केले. तसेच श्री.वि गद्रे
(विश्वस्त बल्लाळेश्वर मंदीर),श्री संदिप परब (इतिहास संशोधक)
गणेश रघुवीर (सह्याद्री प्रतिष्ठान),माजी सरपंच श्री खंडू उतेकर,रुषी झा, बाळा मोरे, आणि श्री अमित गवळी यांचे पालीतील नियोजनात सहकार्य लाभले त्याबद्दल शिवराय ग्रुपने शिवप्रतिमा देऊन आभार व्यक्त केले.
बल्लाळेश्वरचे दर्शन घेऊन पालखी पुढे रायगडकडे मार्गस्थ झाली.
दि. ६ जून रोजी पालखी रायगडावर पोहचेल.शिवराज्याभिषेक दिनाचा इतिहास, महत्त्व आणि या परंपरेचे स्मरण करण्यासाठी अकोल्यातून होणारा हा उपक्रम शिवभक्तांसाठी एक गौरवाचा क्षण ठरत आहे. रायगडावर पोहोचून पालखी सोहळा महाराष्ट्रातील लाखो शिवप्रेमींमध्ये ऐतिहासिक गर्जना निर्माण करणार, असा विश्वास शिवराय ग्रुपने व्यक्त केला आहे.












