गुहागर (प्रतिनिधी): आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जगभरात कुणी ना कुणी तरी वृक्षलागवडीचं काम करत असतं हाच विचार धरून निगुंडळ ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन वृक्षलागवडीचा कार्यक्रम आयोजित केला. आपण प्रत्येकाने 100 जरी झाडं लावायचा संकल्प केला तर वसुंधरेचं रक्षण होवू शकेल. महाराष्ट्र शासनाने 5 वर्षात माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून जल,भूमी,वायू ,अग्नी, आकाश या थीम वर काम करून वसुंधरेची रक्षण करण्याचा संकल्प केला आहे असे सांगून प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर करण्याचे आवाहन यावेळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रमोद केळस्कर यांनी ग्रामस्थांना केले. ग्रामदेवता मंदिर परिसरात फुलझाडं लावून मंदिराच्या सौंदर्यात नक्कीच भर पडेल,असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
ग्रामपंचायत निगुंडळ येथे आज ५ जून 2025 रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी ग्रामदेवता मंदिर परिसरात सोनमोहर, बहावा ,सुरंगी, सोनचाफा ,अशी विविध फुलझाडांची लागवड करण्यात आली.
यावेळी माजी कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी यावेळी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धना बाबतची माहिती दिली.
यावेळी ग्रामपंचायत निगुडंळ सरपंच सौ. दीप्ती गिजे , उपसरपंच सुभाष गावडे ,कृषी अधिकारी आर. के. धायगुडे , ग्रामपंचायत विस्तार अधिकारी शरद भांड ,कृषी विस्तार अधिकारी कृष्णदेव कदम , माजी कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर ,महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना विभागाच्या पालक तांत्रिक अधिकारी नयना जाधव , ग्रामपंचायत अधिकारी सौ. साक्षी गोरे ,कृषी सहाय्यक अमित शेळके , तसेच ग्रामपंचायत सदस्य मयुरेश भागवत , अंकुश पिलवलकर, सौ. सुवर्णा गावडे, सौ. मनीषा पवार व ग्रामदेवता मंदिराचे मानकरी श्री अशोक भागवत काका, ग्रामदेवता कमिटीचे सदस्य संतोष धामणस्कर , पोलीस पाटील प्रकाश आंबोकर व ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचारी अंगणवाडी सेविका लीलावती भुवड,अपूर्वा कानेकर,मदतनीस सुवर्णा समगिसकर,काजल चाळके,आशा सेविका अमृता मुकनाक, ग्रामपंचायत कर्मचारी श्री परशुराम मुकनाक , डाटा ऑपरेटर सौ . धनश्री समगिस्कर, युवा प्रशिक्षणार्थी सौ.सिद्धी चव्हाण व निगुंडळ गावचे ग्रामस्थ वसंत मुकनाक व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.










