सावंतवाडी: मुक्ताई ॲकॅडमीने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कॅरम आणि बुद्धिबळ कोचिंग कार्यशाळेचे आयोजन केले आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या शालेय स्पर्धा आणि ॲकॅडमीच्या स्पर्धांच्या तयारीसाठी ही कार्यशाळा घेण्यात येत आहे.
सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या हॉलमध्ये रविवार, २९ जून रोजी सकाळी ०९:३० ते दुपारी ०१:३० या वेळेत ही कार्यशाळा होईल. श्री. कौस्तुभ पेडणेकर सर कॅरमचे प्रशिक्षण देतील, तर राष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर बुद्धिबळाचे मार्गदर्शन करतील.
कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात येईल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन श्री. कौस्तुभ पेडणेकर सरांनी केले आहे. नावनोंदणीसाठी श्री. कौस्तुभ पेडणेकर यांच्या ८००७३८२७८३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.










