रत्नागिरी ः प्रतिनिधी :तालुक्यातील लांजा येथे वृध्दाने आजारपणाला कंटाळून विषारी औषध प्राशन केले.त्यांना उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रघुनाथ रामचंद्र पवार (65,रा.जावडे लांजा,रत्नागिरी) असे विषारी औषध प्राशन केलेल्या वृध्दाचे नाव आहे.रघ्ाुनाथ पवार हे अर्धांगवायुने पिडीत आहेत.घरात ते एकटेच असतात या आजारपणाला कंटाळून त्यांनी गुरुवार 8 जून रोजी सकाळी 8 वा.सुमारास राहत्या घरी लादी पूसरण्याचे हर्बल लिक्विड प्राशन केेले.काही वेळाने त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यावर त्यांच्या भावाने त्यांना प्रथम लांजा ग्रामीण रुग्णालयात नेउन अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केेले आहे.याबाबत जिल्हा शासकिय रुग्णालयाच्या पोलिस चौकित नोंद करण्यात आली आहे.









