मुंबई विद्यापीठात ‘फिनोलेक्स’च्या मेकॅनिकलची मिसबाह काझी २रा तर जयेश पार्टे याने पटकावला ५ वा क्रमांक

रत्नागिरी : फिनोलेक्स अ‍ॅकॅडमीच्या विदयार्थ्यांचे मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत घवघवीत यश फिनोलेक्स अ‍ॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विदयार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या पदवी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या या पदवी परीक्षेत मेकॅनिकल इंजिनीअरिंग या विभागात कु. मिसबाह मुझफ्फर काझी हिने २ रा क्रमांक व कु. जयेश सुधीर पार्टे याने ५ वा क्रमांक पटकावला आहे.

दरवर्षी प्रमाणे यावर्षीही या महाविद्यालयाच्या विदयार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत घवघवीत यश संपादन करून महाविद्यालयाचे नाव मुंबई विद्यापीठामध्ये कोरले आहे.
या यशाबद्दल फिनोलेक्स अ‍ॅकॅडमीच्या अध्यक्षा श्रीमती डॉ. अरुणा कटारा, मॅनेजिंग ट्रस्टी अमृता कटारा, प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.