रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी देवगडचा अभिनव उपक्रम, रोटरी पेशंट बँक चे देवगड येथे उदघाटन संपन्न

देवगड प्रतिनिधी
कै.रो. संजय धुरी यांचे स्मृतिप्रीत्यर्थ रोटरी पेशंट बैंक एक हात मानवतेचा……..! या पेशंट बँक चे उदघाटन रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी देवगड तर्फे देवगड येथे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर रोटे अरुण भंडारे यांच्या शुभहस्ते माजी डिस्ट्रिकत गव्हर्नर रोटे. संग्राम पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला .
यावेळी अस्सीस्टंट गव्हर्नर सचिन मदने, रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड चे प्रेसिडेंट – रो गौरव पारकर, सेक्रेटरी- रो अनुश्री पारकर, रो मनस्वि घारे – हनिफ, रो- श्रीपाद पारकर,  खजिनदार – दयानंद पाटील, रो विजय बांदिवडेकर , रो अनिल कोरगावकर, रो अनिकेत बांदिवडेकर, रोटे प्रविण पोकळे, रो रमाकांत आचरेकर, रो नरेश डामरी, रो श्यामल पोकळे, रो मनीषा डामरी, रो एकनाथ तेली, रो अनिल गांधी वैद्यकीय व्यावसायिक विद्याधर तायशेट्ये उपस्थित होते.

नव्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ संपन्न

देवगडसारख्या छोट्याशा भागातही उत्स्फूर्त सामाजिक कार्य ‘रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी- देवगड’ करीत असून ही बाब कौतुकास्पद आहे. देवगडला कार्डीॲक ॲम्ब्युलन्सची आवश्यकता असून रोटरी क्लब ऑफ मँगोसिटीच्यावतीने ही कार्डीॲक ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील. चांगल्या कामाच्या पाऊलखुणा आपल्या कारकीर्दीत उमटल्या पाहिजेत, असे उत्कृष्ट कार्य आपल्या हातून घडण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असले पाहिजे, असे मत रोटरी क्लबचे डिस्ट्रीक्ट गर्व्हनर अरुण भांडारे यांनी येथे व्यक्त केले.

देवगड रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी, देवगडचा नूतन पदाधिकारी पदग्रहण सोहळा प्रांतपाल अरुण भंडारे यांच्या हस्ते व क्लबचे असिस्टंट गव्हर्नर सचिन मदने यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील इंद्रप्रस्थ हॉल येथे पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पीडीजी संग्राम पाटील उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी- देवगडचे नूतन अध्यक्ष गौरव पारकर, सचिव सौ. अनुश्री पारकर, तर खजिनदार दयानंद पाटील यांच्यासह नवनियुक्त कार्यकारिणीकडे प्रांतपाल श्री. भांडारे यांनी पदभार सुपुर्द केला. श्री. भांडारे पुढे म्हणाले, आपण समोरच्या व्यक्तीशी कसे वागतो, हे ती व्यक्ती कधी विसरत नाही. त्यामुळे नेहमी चांगल्या गोष्टींचा स्वीकार करावा. चांगले कार्य केले पाहिजे. आपले चांगले कार्य पाहून परमेश्वरालाही आश्चर्य वाटले पाहिजे. आपल्या चांगल्या कार्यातून पृथ्वीवर जणू स्वर्ग निर्माण होतोय की काय, असा प्रश्न परमेश्वरालाही पडला पाहिजे. देवगडला सध्या कार्डीॲक ॲम्ब्युलन्सची गरज असून ही गरज पूर्ण करण्यासाठी रोटरी क्लब पुढाकार घेत आहेत. ग्रामीण भागाच्या वेदना आपण जाणतो. त्यामुळे कार्डीॲक ॲम्ब्युलन्स सेवा लवकरात लवकर उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

सचिन मदने म्हणाले, रोटरीमध्ये नेतृत्व गुण विकसित होतो. आत्मविश्वास दृढ होतो. रोटरी क्लबने यावर्षी ‘युनाईट ऑफ गुड’ अशी थीम राबविली असून चांगल्या कार्यासाठी आपण एकत्र येणे आवश्यक आहे. देवगड रोटरी क्लबने पेशंट बँकसारखा अभिनव उपक्रम राबवून आपल्या कार्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पेशंट बैंक ही आजच्या काळाची गरज आहे. रोटरी फाऊंडेशनकडे आर्थिक स्वरुपात मिळणारे दान हे जगभरातील गरीब, गरजू लोकापर्यंत पोहोचविले जाते. देवगडकरिता कार्डीॲक ॲम्ब्युलन्स या ग्रॅण्ड प्रोजेक्टसाठी देवगडच्या रोटरीच्या नूतन कार्यकारिणीने काम करून हा प्रोजेक्ट यशस्वी करावा, असे त्यांनी सांगितले.

संग्राम पाटील म्हणाले, दान हे समाजासाठी नसावे. प्रत्येकाने स्वतःच्या समाधानासाठी दान केले पाहिजे. समाजाप्रती कर्तव्य करण्याची नैतिक जबाबदारी प्रत्येक नागरिकावर आहे. यासाठी रोटरी क्लब आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ निर्माण करून देत असल्याचे या रोटरी क्लबचे सदस्यत्व घेणे गरजेचे आहे. समाजामध्ये बदल घडविण्यासाठी, समाजाला एक दिशा देण्यासाठी रोटरी क्लबचे प्रयत्न असतात. यातून रोटरी सदस्याला व्यक्तिमत्व विकास साध्य करता येतो, असे त्यांनी सांगितले.

नूतन अध्यक्ष गौरव पारकर म्हणाले, रोटरी क्लब ऑफ मँगोसिटीतर्फे गरीब व गरजू लोकांसाठी अधिकाधिक कार्य करण्याचा, त्यांच्यापर्यंत सुविधा पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. पेशंट बँक, अवयव दान संकल्प, नशामुक्ती अभिमान जनजागृती, गरजू व्यक्तींना शिलाई मशीन वितरण, शालेय मुलांना डेस्क बेंच वितरण, ई लर्निंग कीट, गरजू मुलींना सायकल वितरण, रोटरी फेस्टीवल आदी उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अनिकेत बांदिवडेकर, रुपेश खोत, अयोध्याप्रसाद गावकर यांना नूतन रोटरी सदस्य देण्यात आले. तर मानद सदस्य म्हणून रो. रमेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी बाप्पा रुमडे, विद्याधर जोशी यांना विशेष सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन रो. अनिल गांधी यांनी केले. आभार सचिव अनुश्री पारकर यांनी मानले.