श्रीदेव एकमुखी दत्त मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा..

गुरुपौर्णिमेनिमित्त घुडेवठार येथील श्री एकमुखी दत्त मंदिरात कीर्तनकार ह.भ.प. सौ. सायलीताई मुळे दामले यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी घुडेवठार विलणकरवाडी चवंडेवठार पाटीलवाडीतील ग्रामस्थ तसेच अनेक दत्त भक्त उपस्थित होते. यावेळी सायलीताई यानी श्री एकमुखी दत्त मंदिरात कीर्तनकरण्याची संधी मिळाल्या बद्दल आभार मानले व दत्त मंदिरातील कीर्तन परंपरा अखंड चालू राहावी अशी दत्त चरणी प्रार्थना केली. कीर्तनकार सायलीताई दामले , तबलावादक श्री कैलास दामले व हार्मोनियमवादक श्री महेश दामले यांचा श्री दत्त प्रतिमा व शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला यावेळी श्री सुरेश मालगुंडकर सौ. सत्यवती बोरकर सौ. रूपा नागवेकर श्री मुकुंद विलणकर श्री विशाल विजय मुंडये सौ. माणिक मुंडये, जय बोरकर शुभम नागवेकर ,अनमोल उदय मुंडये, अनिश घुडे, जान्हवी घुडे उपस्थित होते.