चेअरमन मंगेश तांबे आणि सहकाऱ्यांचा सत्कार
चिपळूण (प्रतिनिधी) : नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या दातार, बेहेरे, जोशी (डीबीजे) कॉलेजला स्वायत्त संस्था (ऑटोनॉमस) दर्जा प्राप्त झाल्याबद्दल नुकतेच भारतीय जनता पार्टी शहर मंडळातर्फे अभिनंदन सोहोळा पार पडला.
यावेळी संस्थेचे चेअरमन मंगेश तांबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास माजी शहर मंडळ अध्यक्ष राम शिंदे, माजी नगरसेवक परिमल भोसले, माजी युवक शहराध्यक्ष संदीप भिसे, उपाध्यक्ष महेश कांबळी, अनुसूचित मोर्चा सरचिटणीस अविनाश सावर्डेकर, बूथ अध्यक्ष विवेक गोखले, सुधीर पानकर, श्रद्धा ताई कदम, ओमकार रेडीज, निखिल रतावा, प्रफुल पिसे, सचिन कांबळी, युवा मोर्चा पदाधिकारी शुभम खंडझोडे, साहिल भिसे, वेद सुर्वे, श्रेयस पवार, यश खंडझोडे, अंकुश चौधरी, राज भिसे तसेच इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान वक्त्यांनी डीबीजे कॉलेजच्या शैक्षणिक वाटचालीचा गौरव केला आणि स्वायत्त दर्जा मिळण्यामुळे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवा आयाम मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.













