विधानसभेत आ.निलेश राणे यांनी उबठा नेत्यालाच धारेवर धरल्याने विरोधकांची उडाली गाळण
संतोष राऊळ ( विधानसभा मुंबई)
विधानसभेत अभ्यासपूर्ण भाषणातून मांडणी करणारे आमदार निलेश राणे जेव्हा आक्रमक होतात तेव्हा विरोधकांची कशी “गाळण” होते हे आज विधानसभेत पहावयास मिळाले. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत मुद्दे मांडताना सताधाऱ्यांवर आणि अप्रत्यक्षरीत्या शिवसेना शिंदे सेनेवर केलेली टीका आमदार निलेश राणे यांना सहन झाली नाही आणि त्यांची आक्रमकता उफाळून आली. विधानसभेत आमदार आदित्य ठाकरे यांना थेट उद्देशून “तुम्ही कोणाला उद्देशून बोलतात आणि जे बोलताय ते कोड्यात बोलण्या पेक्षा हिम्मत असेल तर सभागृहात नाव घेऊन थेट बोला. मग पाहू.! अन्यथा शब्द मागे घ्या.” अशा पद्धतीचे आव्हानच दिले.
आमदार निलेश राणे यांची ही आक्रमकता पाहून आदित्य ठाकरे गप्प गारच झालेत.सभागृहातील उबाठा सह काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य तोंडातून एक सुद्धा ब्र काढू शकले नाहीत. एकंदरीतच आमदार निलेश राणे यांच्यासमोर विरोधकांनीही नांगी टाकली अशा पद्धतीचे चित्र आज विधानसभेत पाहायला मिळाले.
आदित्य ठाकरे यांनी चड्डी बनियन गॅंग असा उल्लेख केला. ही टीका शिंदे सेनेच्या आमदारांना उद्देशून केली. हे शब्द संविधानिक नाहीत. आणि ते उपरोधिक पणाने,विरोधकांना डिवचण्यासाठी उच्चारले याचा आमदार निलेश राणे यांना राग आला. यावर आमदार निलेश राणे चांगलेच आक्रमक झाले. आदित्य ठाकरे यांना थेट जाब विचारला. चड्डी कोण ? बनियान कोण ? ते हिम्मत असेल तर सभागृहात नाव घेऊन स्पष्ट करा. आम्ही एक तास तुमचे भाषण ऐकतो आहोत याचा अर्थ तुम्ही काही बोलाल आणि आम्ही एकूण घेऊ असे होणार नाही.आणि तुम्हाला कोणाचे नावघ्याला भीती वाटत असेल तर असे शब्द वापरता च का ? हे शब्द मागे घ्या. अध्यक्ष महाशय सभागृहातील हे शब्द रोलिंग मधून काढून टाका. अन्यथा या सदस्याने कोणाबद्दल हे बोलले आहेत ते सभागृहात बोलण्याची हिंमत दाखवावी मग पाहू असे थेटआव्हान दिले.विधानसभेत आ.निलेश राणे यांनी उबठा नेत्यालाच धारेवर धरल्याने विरोधकांची दोलायमान स्थिती झाली. त्यात नेता आमदार निलेश राणे यांना भिडण्यास घाबरला त्यामुळे सहकारी आमदार सुद्धा काही बोलणार. भास्कर जाधव राणेंचे पारंपरिक विरोधक ते काही तरी बोलतील आणि आमदार राणे यांना विरोध करतील या अपेक्षेने काही आमदारांची नजर सभागृहभर भिरभिरली मात्र स्थबस्त झालेले सभागृह तालुका अध्यक्षांनी पुढील आमदारांचे नाव पुकारले आणि पुढील कामकाज चालू झाले तेव्हा विरोधी आमदारांनी सुटकेचा श्वास सोडला.
आमदार निलेश राणे आक्रमक झालेले की कोणाचाच मुलाहिजमा बाळगत नाहीत हे विरोधकांना सुद्धा बऱ्यापैकी माहीत आहे.यावेळी आदित्य ठाकरे यांच्या सोबत आमदार भास्कर जाधव, काँग्रेसचे आमदार नितीन राऊत, यांच्या सह अनेक आमदार विरोधी बाकावर उपस्थित होते मात्र आमदार राणे यांची आक्रमकता पाहून त्यांच्याशी पंगा कोण घेणार.जो घेईल त्याचा आधी पाणउतारा होणार हे माहित असल्याने सर्वच विरोधक गप्प झाले. काही जण उठून ही गेले. एकंदरीत आमदार निलेश राणे यांच्या समोर भिडण्याचे धाडस उबाठा आमदाराना झाले नाही एवढा दरारा आज विधानसभेत पहावयास मिळाला.











