निराधार भगिनींसाठी मदतीचा हात – लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचा स्तुत्य उपक्रम

खेड | २२ जुलै २०२५ — निराधारांना आधार या संकल्पनेतून लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने मुकादम हायस्कूल येथे जलालशा मोहल्ल्यातील दोन निराधार भगिनींना महिन्याभराचे जीवनावश्यक जिन्नस भेट स्वरूपात प्रदान करण्यात आले.

या वेळी क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, ज्येष्ठ सदस्य हनीफ भाई घनसार, माजी अध्यक्ष रोहन विचारे, खजिनदार माणिक लोहार, विनोद मोरे आदी सदस्य उपस्थित होते.

समाजातील दुर्बल घटकांना हात देण्यासाठी लायन्स क्लबने घेतलेला पुढाकार हा कौतुकास्पद असल्याची भावना मुकादम हायस्कूलचे प्राचार्य यांनी व्यक्त केली. महिला सक्षमीकरण आणि सामाजिक सेवा यासाठी लायन्स क्लब सातत्याने उपक्रम राबवत असून, ही सामाजिक जाणिव समाजात सकारात्मक संदेश देणारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपस्थित सर्वांनी शुभेच्छा दिल्या.