भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या स्वनिधीतुन बांधण्यात आलेल्या देवळे व तळेंकांटे येथील प्रवासी मार्ग निवाऱ्यांचे लोकार्पण

राजापूर (प्रतिनिधी ): भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या स्वनिधीतून कोकणात एसटीचा प्रवासी निवारा शेड बांधणे या उपक्रमांतर्गत बांधण्यात आलेल्या संगमेश्वर तालुक्यातील देवळे व तळेकांटे येथील प्रवासी थांब्याचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. भाजपाच्या महिला मोर्चा प्रदेश सचिव सौ. शिल्पा मराठे यांच्या हस्ते या प्रवासी शेडचा श्रीफळ वाढवून लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी दक्षिण रत्नागिरीचे महामंत्री अमित केतकर , रत्नागिरी मध्य मंडल अध्यक्ष प्रतीक देसाई , सुबोध आठल्ये , देवळे सरपंच सौ.कोरगावकर, माजी सरपंच गंगाराम केसरकर,सौ. आठल्ये सौ. नपुरा मुळे, तळेकांटे गावच्या भारतीय जनता पार्टीच्या सरपंच सौ. बने, संदीप बने, बाबा बने, राजेश आंबेकर, करकरे, विवेक आठल्ये यांसह या दोन्ही गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्हा भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. या दोन्ही गावातील ग्रामस्थांनी प्रदेशाध्यक्ष आ. चव्हाण राबवत असलेल्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले व धन्यवाद दिले. या दोन्ही ठिकाणी एसटीच्या प्रवासी थांबा नूतनीकरण विषयात भाजपाच्या महिला मोर्चा प्रदेश सचिव सौ . शिल्पा मराठे यांचे विशेष योगदान असल्याबद्दल त्यांचा ग्रामस्थांतर्फे गौरव करण्यात आला आणि त्यांना धन्यवाद देण्यात आले.
फोटो 29 आरजेपी 2
भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या स्वनिधीतुन बांधण्यात आलेल्या प्रवाशी मार्ग निवारा शुभारंभ प्रसंगी भाजपाच्या महिला मोर्चा प्रदेश सचिव सौ. शिल्पा मराठे यांसह भाजपा पदाधिकारी व ग्रामस्थ.