चिपळूण (प्रतिनिधी) : काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते तसेच राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असणाऱ्या सोनललक्ष्मी घाग यांची उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पुरेसे यश न आल्याने पक्षाने मोठे फेरबदल केले आहेत.
काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष असून पक्षाने पुनर्बांधणी करून तरुण व नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. नुकतेच उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोनललक्ष्मी घाग यांच्याकडे देण्यात आली आहे. श्रीमती घाग यांनी प्रदेश उपाध्यक्ष पदावर काम केले आहे. त्याने पक्षाच्या कामामध्ये अविरत मेहनत घेतली असल्याने त्या आदर्श कार्यकर्ता अशीच त्यांची ओळख आहे. त्यांच्या या कामाची पोचपावती म्हणून त्यांची रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे रत्नागिरीत काँग्रेसला नवी उभारी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस पक्ष मजबूत व्हावा या हेतूने सोनललक्ष्मी घाग यांची निवड करण्यात आली असल्याचे बोलले जात आह. या निवडीबद्दल बोलताना श्रीमती घाग म्हणाल्या की, काँग्रेस पक्ष हा सेक्युलर पक्ष आहे सर्व जाती-धर्माच्या लोकांना घेऊन जाणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्षाने आपल्यावर जो विश्वास दाखवला तो आपण सार्थक लावण्याचा प्रयत्न करणार आहे व पक्ष वाढवण्यासाठी तळागाळापर्यंत पोचून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे श्रीमती सोनललक्ष्मी घाग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
सोनललक्ष्मी घाग- सीपीएन३०-७










