आमदार निलेश राणे ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन समस्या घेणार जाणून
अमित खोत | मालवण : वायरी तेली पाणंद समुद्रकिनारी बंधारा नसलेल्या भागात लाटांच्या तडाख्यात नुकसान होत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी या भागाची पाहणी केली. ग्रामस्थांच्या समोरच आमदार निलेश राणे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली.
दरम्यान, मालवण दौऱ्यात ग्रामस्थाना भेटून सर्व समस्या जाणून त्या तात्काळ सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार निलेश राणे यांनी आश्वस्त केले आहे.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, शिवसेना सांस्कृतीक विभाग जिल्हा प्रमुख भालचंद्र केळूसकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, उपतालुकाप्रमुख बाळू नाटेकर, वायरी भूतनाथ सरपंच भगवान लुडबे, देवली सरपंच शाम वाक्कर, वायरी भूतनाथ विभाग प्रमुख मंदार लुडबे, ग्रामपंचायत सदस्य प्रतीक्षा केळूसकर, महिला तालूका प्रमुख मधुरा तुळसकर, प्रियांका मेस्त्री, माजी ग्रामपंचायत सदस्य कविता मोंडकर, माजी उपसरपंच संदेश तळगावकर, कन्हया माडये, साई माडये, उदय पाटकर, गुरु पाटणकर, चंद्रकात मातोंडकर, किरण वालावालकर, ओंकार लुडबे, दीपक कुरदळे, बंड्या माणगावकर, सिद्धेश केळूस्कर राजन चव्हाण, महादेव चव्हाण, प्रकाश डिचोलकर, प्रथमेश डिचोलकर, विनय मातोडकर, गुरु केळूसकर, दादा वेंगुर्लेकर, अनुराधा पाटकर, अरुण तोडणकर, संदीप भोजने, सूरज बिरमोळे, स्वप्नील केळूसकर, विशाल केळूसकर, दादा झाड, कुणाल वालावलकर, प्रकाश डिचोलकर, निलेश लुडबे, चेतन मांजरेकर यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.












