मंडणगड : प्रतिनिधी, दि. 1 – महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशन आयोजित 37 वी राज्य वरिष्ठ क्लोरुगी आणि अकरावी पूमसे तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेत मंडणगड मधील स्वराज सुनील आईनकर हा 54 वजनी गटात सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे. त्याने ठाणे येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्याने ओडिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तो महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी त्याची निवड झाली आहे.
स्वराजच्या या कामगिरीने मंडणगड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2025 रोजी जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियम कटक ओडिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल. स्वराज सध्या वॉरियर तायक्वांदो अकॅडमी सानपाडा येथे प्रशिक्षण घेत असून प्रशिक्षक मंगेश आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेची तयारी करीत आहे. स्वराजच्या या कामगिरीबाबत तालुक्यातून त्याच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत असून राष्ट्रीय स्पर्धेतील उत्तम कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्याच्या या यशामध्ये मध्ये मंडणगड तालुका तायक्वांदो अँकँडमीचेही मोलाचे योगदान आहे. मंडणगड तालुका तायक्वांदो अँकँडमीचे विश्वदास लोखंडे व सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वराजचे अभिनंदन केले आहे.
फोटो – स्वराज आईनकर










