कोंडगे येथील जय गणेश प्राईड इंडिया शेतकरी गटाला शेतीपूरक उपकरणांचे वाटप

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील कोंडगे गावातील जय गणेश प्राईड इंडिया शेतकरी गटाला एच. डी. एफ. सी बॅकेच्या सी.एस.आर फंडाच्या माध्यमातून दि. प्राईड इंडिया संस्थेच्यावतीने शेतीपूरक उपकरणांचे नुकतेच वाटप करण्यात आले.

कोकणात शेतीची भरभराट व्हावी या उद्देशाने दि. प्राईड इंडिया ही संस्था अनेक वर्षे कार्यरत आहे.कोकणातून सातत्याने होत असलेल्या स्थलांतरामूळे मनुष्यबळाचा अभाव निर्माण झाला असून शेतीचे प्रमाण घटले आहे. मनुष्यबळाअभावी बंद पडत चाललेली शेती टिकविण्यासाठी शेतीमध्ये उपकरणांचा वापर करून मनुष्यबळाच्या अभावाची समस्या सोडविता येणार आहे. या उद्देशाने दि प्राईड इंडिया संस्थेच्यावतीने कोंडगे येथील जय गणेश प्राईड इंडिया शेतकरी गटाला संस्थेचे समुह संघटक – प्रसाद दिवटे, तांञिक सहाय्यक – सचिन रसाळ यांच्या हस्ते पावविडर, ग्रासकटर, चैन – सॉ, पावर स्प्रे, इतर उपकरणे प्रदान करण्यात आली.

शेतकर्याचे गावामध्ये गट स्थापन करुन गटाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून शेतीला प्रोत्साहन देण्याचे काम दि. प्राईड इंडिया ही संस्था काम करते. त्यांच्या वेगवेगळ्या उपक्रमांपैकी एक उपक्रमा अंतर्गत जय गणेश प्राईड इंडिया शेतकरी गटाला ही उपकरणे प्रदान करण्यात आली आहेत. यासाठी एच. डी. एफ. सी बॅकेच्या सी. एस. आर. फंड वापरण्यात आला आहे.

दरम्यान, यावेळी सरपंच एस. व्ही. कदम, उपसरपंच – पुंडलिक बेर्डे, पोलीस पाटील – वनिता सावंत, ग्रामविकास प्रकल्प अध्यक्ष – गंगाधर कोंडगेकर, सरचिटणीस – विवेक काटकर, जय गणेश गटाचे अध्यक्ष – मंगेश कदम, सरचिटणीस – भरत कदम, यशोधन ॲग्रोचे मालक – प्रणय निकम, अनिल कदम व संतोष कदम हे मान्यवर उपस्थित होते.