खेड – ( प्रतिनिधी )
दिनांक 2 ते 4 ऑगस्ट दरम्यान जिल्हा संघटनेच्या मान्यतेने शहानूर चिपळूण तालुका तायक्वॉंडो ॲकॅडमी यांच्या वतीने जिल्हा अजिंक्यपद तायक्वॉंडो स्पर्धा स्वामी मंगल कार्यालय बहादूरशेख नाका येथे संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल, खेडच्या विद्यार्थ्यांनी सुवर्ण, कांस्य, रौप्य अशा अठरा पदकांची कमाई केली.
सदरच्या स्पर्धेमध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडच्या 44 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये कु. स्वस्तिका खरावते, कु. हर्ष सुंदेशा, कु. रुद्र आदवडे, कु. आयुष जाधव, कु. ईश्वरी गोरे व कु. विधी गोरे यांनी सुवर्ण पदक, तर कु. सई चाळके, कु. उदय मोरे, कु. देवाशिष तपकीरे, कु. निपुण विनायक, कु. स्वरा चव्हाण, कु. रुद्रनील मोहिते यांनी रौप्य पदक आणि कु. अनुज सुर्वे, कु. जिया चिखले, कु. अनिमेश काटकर, कु. कार्तिक चव्हाण, मोहम्मद अम्मार जुवेकर, कु. शुभम ढेबे, कु. ओम गोगावले व रिझा काझी या विद्यार्थ्यांनी कांस्य पदक पटकावून आपले व रोटरी स्कूलचे नाव रोशन केले आहे.
सुवर्णपदक विजेत्यांची राज्यस्तरावर होणाऱ्या तायक्वॉंडो स्पर्धेकरिता निवड झाली आहे. खेळाडूंनी मिळविलेल्या यशामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
तायक्वॉडो संघामधील सर्व यशस्वी खेळाडूंना तायक्वॉडो प्रशिक्षक श्री. कृणाल चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.











