बांदा : प्रतिनिधी
बांदा – पत्रादेवी रोडवर बांदेश्वर मंदिर ते लकरकोट दत्तमंदिर पर्यंत मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे रिक्षाचालक संघटना व बांदा ग्रामस्थ यांनी श्रमदानातून बुजवले. ऐन गणेश चतुर्थी काळात या रोडवर मोठ्या प्रमाणात पावसामुळे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते. रिक्षा चालक संघटना सदस्यांच्या उपक्रमाबद्दल नागरिकांमधून कौतुक करण्यात आले.
बांदा – पत्रादेवी रस्त्यावर गणेश चतुर्थी काळात वाहनांची मोठी वर्दळ असते. शेजारच्या गोवा राज्यातील ग्राहक खरेदीसाठी बांदा बाजारपेठेत येत असतात. रिक्षा चालक संघटना यांनी पुढाकार घेत सदर खड्डे श्रमदानातून बुजवले.
याकामी माजी उपसरपंच तथा भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस जावेद खतिब यांचे विशेष सहकार्य लाभले. या श्रमदानात सुनील माजगावकर, उल्हास शेवडे, अनिल माजगावकर, दाजी परब, दशरथ परब, योगेश सावंत मोर्ये, माजी उपसरपंच हर्षद कामत, अनिल म्हाडगूत, श्री. गडेकर, श्री. तारी यांनी योगदान दिले.












