विरण येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण!

राकेश परब यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णवाहीका जनसेवेत
वर्दम हायस्कुल येथे शैक्षणिक साहित्य वाटप.

मसुरे | झुंजार पेडणेकर

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे स्वीय्य सहाय्यक राकेश परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विरण येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. राकेश परब यांच्या हस्ते विरण बाजारपेठ येथे फित कापून उदघाट्न करण्यात आले.
यावेळी माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर, माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई, मसदे -चुनवरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच शमिका वाडकर, सौ. राखी राकेश परब, उद्योजक दया देसाई, संतोष मुणगेकर, उपसरपंच सचिन पाताडे, दिपक भोगले, मंगेश पालव,अमित देसाई, राजाराम ठाकूर, दत्ताराम आंबेरकर, संतोष पाटणकर, अर्जून पवार, महेश माधव, बाबू परब, मुकेश नार्वेकर, शेखर सुपल, समिर वाळके व सहकारी उपस्थित होते.
तसेच सौ.ई.द.वर्दम हायस्कूल पोईप विरण या प्रशालेच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व वह्या वाटप करण्यात आले. त्यावेळी राकेश परब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
जनतेला अधिकाधिक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राकेश परब हे सातत्याने प्रयत्नशील असतात. गतिमान विकासकामानबद्दल ते नेहमी त्याच सहकार्य लाभत असते.
सेवा सुविधा उपलब्ध करुन देत आहेत. याचाच एक भाग म्हणून राकेश परब यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने रुग्णवाहिका विरण पंचक्रोशीतील जनतेला उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशी माहिती माजी जि.परिषद. बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांनी दिली.