जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय माजी सैनिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी कल्याण संघटकांचा दौरा

रत्नागिरी – जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत माजी सैनिक/माजी सैनिक विधवा/वीर नारी/वीर माता/वीर पिता/ यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कल्याण संघटकांचे दौरे आयोजित करण्यात आले आहेत. दौऱ्याच्या वेळी अभिलेख कार्यालय विषयक, पेन्शन विषयक, महासैनिक पोर्टलवर रजिस्ट्रेशन (नोंदणी) तसेच इतर अडचणी सोडविण्यात येतील. संबंधितांनी डीस्चार्ज पुस्तक, पी.पी.ओ.ची प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे पासबुक, इ.सी.एच.एस. कार्ड व आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल फोन इत्यादी कागदपत्रे सोबत आणावे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.*
चिपळूण तालुक्यामध्ये 4 सप्टेंबर, 19 सप्टेंबर 2025 रोजी  सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण येथे दौरा होणार असून अधिक माहितीसाठी अनिल मोरबाळे संपर्क क्रमांक 7218498627 आणि 12 सप्टेंबर व 26 सप्टेंबर 2025 रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण येथे दौरा आयोजित करण्यात आला असून अधिक माहितीसाठी कल्याण संघटक राहुल काटे मो.क्र. 8210252830 यांना संपर्क साधावा.  खेड तालुक्यात 8 सप्टेंबर, 15 सप्टेंबर, 23 व 29 सप्टेंबर 2025 रोजी सैनिक मुलांचे वसतिगृह खेड येथे दौरा असून कल्याण संघटक सुनिल कदम मो.क्र. 9413541588 यांना संपर्क साधावा.  मंडणगड तालुक्यात 9 सप्टेंबर 2025 रोजी भोसले प्लाझा येथे दौरा असून कल्याण संघटक सुनिल कदम मो.क्र. 9413541588 यांना संपर्क साधावा.