अवघ्या १० वर्षीय मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू

गणपतीपुढे खेळून आईच्या कुशीत विसावला तो कायमचाच…

प्रतिनिधी/ रोहन कांबळे :कोल्हापूर: जिल्ह्यातील कोडोली या गावातील एका दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली. श्रावण गावडे असे मृत मुलग्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मित्रांसोबत गणेश मंडळांच्या मंडपात श्रावण गावडे हा खेळत होता अचानक अस्पष्ट वाटू लागल्याने तू मध्येच खेळ सोडून आपल्या आईच्या कुशीत जाऊन झोपला मात्र आईच्या मांडीवर डोके टेकवले आणि श्रावणला हृदयविकाराचा तीगर झटका आला त्याच्या आईला काही कळण्याआधीच त्याचा मृत्यू झाला.अचानक मुलाने हालचाल थांबवल्याने आईला लक्षात आले आईने जागेच हंबरडा फोडला.ओरडा ऐकून शेजारी घटनास्थळी आले. ताबडतोब मुलाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून मुलाचे निधन झाल्याचे स्पष्ट केले. चार वर्षांपूर्वी श्रावणच्या बहिणीचाही मृत्यू झाला होता. श्रावणच्या मृत्यूने गावडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.