माचाळ जिल्हा परिषद शाळेची वीजेची गैरसोय होणार दूर

उद्योजिका वैदेही धनंजय वळंजू यांची वीज मीटरसाठी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत

लांजा (प्रतिनिधी) लांजा येथील उद्योजिका व सामाजिक कार्यकर्त्या वैदेही धनंजय वळंजू यांनी
तालुक्यातील माचाळ येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेला वीज मिटरसाठी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. यामुळे शाळेची वीजेची गैरसोय दूर होणार आहे.
तालुक्यातील माचाळ येथील जिल्हा परिषद शाळेत यापूर्वी वीज होती. मात्र बिल थकल्याने महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळेत वीज नव्हती. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती. त्यानंतर शासनाकडून थकलेले वीज बील भरण्यात आले होते.
मात्र नवीन वीज मीटर नसल्याने शाळेत वीज नव्हती. ही बाब लक्षात घेऊन शाळेचे मुख्याध्यापक प्रफुल्ल पट्टेबहाद्दूर यांनी लोकसहभागातून आर्थिक मदत मिळविण्यासाठी प्रयत्न केले. शाळेची गरज लक्षात घेऊन लांजा येथील उद्योजिका वैदेही वळंजू यांची वीज मीटरसाठी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. त्यांच्या या मदतीमुळे शाळेची वीजेची गैरसोय दूर होणार आहे.
वैदेही धनंजय वळंजू यांनी यापूर्वी माचाळ येथील शाळेतील मुलांना रेनकोट आणि माचाळ वासियांना ११० केशर आंब्यांचा झाडाचे वाटप करण्यात आले होते. तर आता मुलाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या हेतूने शाळेंत लाईटची व्यवस्था करण्यासाठी ५००० रूपयांची मदत केली
दरम्यान, या आर्थिक मदतीवेळी माचाळ चे गावकर पांडुरंग पाटील, विजय पाटील, कृष्णा पाटील, पोलिस पाटील विष्णू पाटील, शिक्षक सचिन नागरगोजे, अंगणवाडी सेविका रिचा मांडवकर आदी उपस्थित होते.