मैत्री फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थी गुण गौरव व करिअर मार्गदर्शन समारंभ –

मंडणगड : प्रतिनिधी,– मैत्री फाउंडेशन, मंडणगड या संस्थेच्या वतीने 20 सप्टेंबर 2025 रोजी विद्यार्थी गुणगौरव व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह या ठिकाणी सकाळी 11 वा. कार्यक्रमास सुरवात होणार असून या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास करिअर संदर्भातील मार्गदर्शन व माहिती करीता विद्यार्थी, संबंधितांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मनोज मर्चंडे यांनी केले आहे.