जिजाऊ संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश पांचाळ यांचा कुणबी समाजोन्नती संघातर्फे गौरव

लांजा( प्रतिनिधी) जिजाऊ सामाजिक, शैक्षणिक संघटनेचे लांजा तालुका अध्यक्ष म्हणून काम करणारे योगेश पांचाळ यांचा कुणबी समाजोन्नती संघ मुंबई यांच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला .
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे लांजा तालुका अधक्ष म्हणून काम करणारे योगेश पांचाळ यांनी या संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील गोरगरीब जनतेला मोफत आरोग्य सेवा देण्याचे काम केले आहे .त्यांच्या या एकूणच सामाजिक कार्याची दखल घेत कुणबी समाजोन्नती संघ मुंबई यांच्या वतीने नुकताच त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला .
या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे सहसचिव रवींद्र कुर्तडकर, माधव कांबळे, कार्यकारिणी सदस्य रमेश कानावले, संभाजी काजरेकर, कुणबी युवा मुंबई सरचिटणीस सचिन रामाणे, युवा संगमेश्वर तालुका अध्यक्ष संजय गोंधळी, सरचिटणीस प्रदीप धुमक, विवाह सल्लागार मंडळ उपाध्यक्ष प्रभाकर मांडवकर, सहसचिव अविनाश आग्रे, कार्यकारिणी सदस्य विजय भोस्तेकर व प्रचारक कामेश घाडी उपस्थित होते.