कु.पूजा म्हाडदळकर चे सर्वत्र होते आहे कौतुक
कुडाळ | प्रतिनिधी :कुडाळ नेरूर येथील कु. पूजा म्हाडदळकर हिने पुण्यात झालेल्या ‘मी महाराष्ट्राची सौंदर्यवती 2025’ या राज्यस्तरीय सौंदर्यस्पर्धेत प्रभावी कामगिरी करीत द्वितीय क्रमांक पटकावला.
१४ सप्टेंबर रोजी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे रंगमंदिर, येरवडा आणि मौलाना अबुल कलाम आझाद मेमोरियल हॉल, कोरेगाव पार्क, पुणे येथे ही स्पर्धा पार पडली. एक दिवसीय ट्रेनिंग, मेकअप–हेअरस्टाईल मार्गदर्शन, फोटोशूट, ट्रॉफी, क्राउन, प्रमाणपत्र, पदक, सॅश, गिफ्ट व्हाउचर अशा विविध टप्प्यांचा समावेश या कार्यक्रमात होता.
पूजाने यापूर्वीही अनेक स्पर्धांत यश मिळवले आहे. रेकॉर्ड डान्स स्पर्धेत कविलगाव प्रथम, रेडी द्वितीय, पिंगुळी प्रथम, सोनवडे उत्तेजनार्थ असे मानाचे क्रमांक मिळवले. मॉडेलिंग क्षेत्रात स्वरागिनी महिला रॅम्प ऑक तृतीय, मालवण सुंदरी बेस्ट कॅट वॉक, मिस आंदुर्ले २०२५ बेस्ट रॅम्प ऑक, दीपोत्सव ओरोस २०२४ तृतीय, ऑनलाइन फॅशन शो २०२४ चौथा रनरअप, मिस इंद्रधनु २०२३ बेस्ट हेअर स्टाईल अशी यशस्वी कामगिरी तिच्या खात्यात आहे.
तसेच कोकण नाऊ चैनल २०२४ बेस्ट पर्सनॅलिटी, इनरव्हील क्वीन मिस सावंतवाडी २०२४ – २५ बेस्ट कॅट वॉक, मळेवाड कोंडुरे मिस कोंडुरे बेस्ट कॅट वॉक, पिंगुळी महोत्सव २०२४ बेस्ट कॅट वॉक यांसारख्या अनेक स्पर्धांमध्ये पूजाने आपली छाप उमटवली आहे.
या यशामध्ये कास्टिंग डायरेक्टर व रॉयल ग्रुप डायरेक्टर नितीन जगरे यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे पूजाने सांगितले.











