स्वछता अभियातनात देखील मिळवला प्रथम क्रमांक
गौरव पोंक्षे | माखजन
संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे ग्रामपंचायतीला मानाचा समजला जाणारा महाराष्ट्र शासनाचा स्वर्गीय वसंतराव नाईक जिल्हा स्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.व संत गाडगेबाबा स्वछता अभियान धामापूर जि. प गटात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.या ग्रामपंचायतीच्या उल्लेखनीय कामाबद्दल पंचक्रोशीतच नव्हे तर जिल्हाभरातून कौतुक होत आहे.
याची दखल चिपळूण संगमेश्वर विधानसभा अंतर्गत झालेल्या देवरुख येथील आमसभेत,सरपंच शेखर उकार्डे व ग्रामसेवक आभिजित चव्हाण यांचा आमदार शेखर निकम यांनी सन्मान केला यावेळी तालुक्याच्या तहसीलदार सौ अमृता साबळे माने देखील उपस्थित होत्या.
आंबव पोंक्षे गावात केंद्रशासनाच्या व राज्यशासनाच्या विविध योजना प्रभावी पणे राबवण्यात येत आहेत.शासनाची नळपाणी योजना,वृक्षलागवडीच्या विविध योजना गावात प्रभावी पणे राबवण्यात आल्या आहेत.विद्यार्थ्यानासह,रहिवाशांना लागणारी विविध कागदपत्रांसाठी चे कॅम्प,विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्ग,विविध विमा योजना,कृषी विषयक मार्गदर्शन,पाणी अडवून जिरवण्याच्या योजना,श्रमादानातून विविध कामे देखील मार्गी लावण्यात येत आहेत.
ग्रामपंचातीचे सरपंच शेखर उकर्डे,उपसरपंच मंगेश मांडवकर,सदस्य सौ निधी भायजे,सौ रिया मायनाक,सौ दीपाली कुडतडकर ,श्री सुनील घडशी,ग्रामसेवक अभिजित चव्हाण आदी विशेष मेहनत घेत आहेत.सेवक सौ पूर्वा भुवड,डाटा ऑपरेटर सौ अनघा नेटके देखील महत्वाची भूमिका बजावत आहेत.
ग्रामपंचायतीने केलेल्या उल्लेखनीय कामामुळे,व ग्रामस्थ मंडळींनी केलेल्या सहकार्यामुळेच हा पुरस्कार मिळाला असल्याचे शेखर उकार्डे यांनी पत्रकाराना सांगितले












