रिक्षातुन २ लाख १० हजार ६४० रुपये किमतीचा देशी विदेशी मद्य साठा जप्त दोन संशयित ताब्यात
जैतापूर | वार्ताहर नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमिवर पोलीसांकडून अधिक सतर्कता बाळगली जात आहे. यासाठी रात्रीच्या गस्तीमध्येही वाढ करण्यात आली असून अशाच प्रकारे रात्री गस्त घालत असताना नाटे पोलीसांनी एका ऑटो रिक्षाची तपासणी केली असता या रिक्षातुन विनापरवाना मद्यवाहतूक व विक्री करत असल्याचे आढळून आले. त्वरित चौकशी व पडताळणीमध्ये संशयितांकडून आणि वाहनातून एक रिक्षा व देशी-विदेशी दारू असा एकूण दोन लाख दहा हजार सहाशे चाळीस रूपये किंमतीचे मुद्देमाल जप्त केला आहे. नाटे जैतापूर मार्गावर नाटे पोलीसांनी मंगळवारी रात्री ही धडक कारवाई केली आहे.
या प्रकरणी नाटे पोलीसांनी गणेश रमेश सुर्वे, तुळसुंदे व निलेश प्रभाकर आडीवरेकर, मिठगवणे यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, 1949 च्या तरतुदी 65(अ) व 65(ई) अन्वये CR/68 नंतर गुन्हा नोंदवण्यात आला असून गुन्हा दाखल केला आहे. तशी माहिती पोलीसांनी दिली आहे.
नवरात्र उत्सव काळात स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी पोलीसांकडून गस्त वाढवण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी लांजा सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नाटेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय पाटील, किरण जाधव, सचिन आडबे, सागर गुरव यांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलीसांकडून अधिक तपास सुरू असल्याचे पोलीसांनी सांगितले.
फोटो 1 आरजेपी 1
जैतापूर नाटे सागरी महामार्गावर रिक्षातुन दारू वाहतुक करणाऱ्यांना नाटे पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.













