20 पैकी 10 जागा महिला आरक्षित : प्रभाग 4 मध्ये अनुसचित जाती आरक्षण : प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे यांच्या उपस्थित आरक्षण सोडत
मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषद दहा प्रभागातील २० जागांची आरक्षण सोडत काढण्यात आली. आरक्षणात काही विद्यमान नगरसेवकांना फटका बसला असून त्यांना अन्य प्रभागात संधी मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. अनेक ठिकाणी इच्छुक असलेल्या नव्या चेहऱ्यांनाही संधी मिळणार असल्याचे चित्र आहे. एकूणच आरक्षण सोडत नंतर ‘कही ख़ुशी कही गम’ असे चित्र दिसून येत आहे.
ज्या प्रभागात अनुसूचित जातीची लोकसंख्या टक्केवारीनुसार जास्त आहे त्यानुसार प्रभाग चार मध्ये अनुसूचित जाती आरक्षण निश्चित करण्यात आले. याठिकाणी एक जागा अनुसूचित जाती सर्वसाधारण साठी आरक्षित करण्यात आली. तर दुसरी जागा महिला सर्वसाधारण (खुली) आरक्षित करण्यात आली आहे. मालवण नगराध्यक्ष आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (ओबीसी) हे यापूर्वीच निश्चित झाले आहे.
मालवण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 आरक्षण सोडत प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे, प्रभारी मुख्याधिकारी संकेत गायकवाड यांच्या उपस्थितीत टोपीवाला हायस्कूलच्या गौरी वस्त, देवयानी कुलकर्णी, अनिमिष पवार, अनुज चव्हाण या चार विद्यार्थ्यांच्या हस्ते आरक्षण काढण्यात आली. यावेळी नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
*प्रभागनिहाय आरक्षण*
*प्रभाग १ अ : सर्वसाधारण (खुले), ब : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग २ अ : सर्वसाधारण (खुले), ब : सर्वसाधारण (खुले) महिला, प्रभाग ३ अ : सर्वसाधारण (खुले), ब : सर्वसाधारण (खुले) महिला, प्रभाग ४ अ : अनुसूचित जाती, ब : सर्वसाधारण (खुले) महिला, प्रभाग ५ अ : नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब : सर्वसाधारण (खुले) महिला, प्रभाग ६ अ : सर्वसाधारण (खुले), ब : सर्वसाधारण (खुले) महिला, प्रभाग ७ अ : सर्वसाधारण (खुले), ब : सर्वसाधारण (खुले) महिला, प्रभाग ८ अ : नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब : सर्वसाधारण (खुले) महिला, प्रभाग ९ अ : सर्वसाधारण (खुले), ब : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग १० अ : सर्वसाधारण (खुले), ब : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला*
यावेळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, भाजपा शहराध्यक्ष बाबा मोंडकर, भाजपा महिला शहराध्यक्ष अन्वेशा आचरेकर, माजी नगरसेवक गणेश कुशे, पंकज सादये, महेंद्र म्हाडगुत, पूजा करलकर, भाजपा ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष पूजा वेरलकर, भाजपा शहर सरचिटणीस महिमा मयेकर, शिवसेना जिल्हा संघटक अंजना सामंत, बाबी जोगी, तपस्वी मयेकर, नरेश हुले यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते.











