आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून नगरोत्थान योजनेतून मालवण शहरात पहिल्या टप्प्यात 1 कोटी 35 लाख निधी मंजूर

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा पाठपुरावा

शिवसेना मालवण शहरप्रमुख दिपक पाटकर व शहर संघटक राजू बिडये यांची माहिती

अमित खोत | मालवण : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सन 2025-26 करता नगरोत्थान महाअभियान योजनेतून मालवण शहरात पहिल्या टप्प्यात 1 कोटी 35 लाख निधी मंजूर झाला आहे. यात 8 विकासकामाना मंजुरी देण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना मालवण शहरप्रमुख दिपक पाटकर व शहर संघटक राजू बिडये यांनी दिली. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या पाठपुराव्यातून आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून हा निधी मंजूर झाला असल्याचे सांगत दिपक पाटकर, राजू बिडये यांनी आभार व्यक्त केले आहेत.

 

मंजूर निधी व विकासकामे

 

▪️चीवला बीच धुरीवाडा कुरण ते राणेसाहेब नीलरत्न बंगला पर्यंत पथदीप बसविणे. (10 लाख)

 

▪️मालवण दांडी शहर खराडे मार्ग ते सामंत रीसोर्ट पर्यंत संरक्षणभिंत आणि रस्ता दुभाजक व्हाळी करून बांधकाम करणे. (10 लाख)

 

▪️चिवला बीच नीलरत्न बंगला ते नाथ पै सेवांगण पर्यंत अस्तित्वातील रस्ता दुरुस्त करणे. (25 लाख)

 

▪️चिवला बीच कुरण ते नाथ पै सेवांगण पर्यंत अस्तित्वातील रस्ता दुरुस्त करणे. (25 लाख)

 

▪️मालवण शहर पिंपळपार लौकिक हॉटेल ते मौनी नाथ मंदिर राजकोट किनारपट्टीपर्यंत अस्तित्वातील गटारावर लादी बसविणे. (25 लाख)

 

▪️मालवण शहर फोवकाडा पिंपळपार येथे सेल्फी पोइंट उभारणे व कारंजा पूर्ववत सुरु करणे. (20 लाख)

 

▪️मालवण शहर बसस्थानक परिसर मध्ये ऐतिहासिक पोइंट उभारणे. (10 लाख)

 

▪️देवूळवाडा येथे अद्ययावत गणेश घाट बांधणे. (10 लाख) ही कामे मंजूर झाली आहेत.