दापोली :
विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी जिद्द व मेहनत व एकाग्रता ठेऊन अभ्यास केल्यास यश मिळवणे दूर नाही त्यासाठी प्रयत्न करावेत. तुम्ही मिळवलेले यश हे कौतुकास्पद असून तुमच्या यशाचा आलेख असाच चढता क्रमाने रहावा अशा शुभेच्छा दापोली येथे आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहोळ्यात मान्यवरांनी व्यक्त केल्या.रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढी मर्यादित, रत्नागिरी शाखा दापोलीच्या वतीने सभासद प्रशिक्षण कार्यक्रम व विद्यार्थी गुणगौरव सोहळा रविवारी संपन्न झाला. हा कार्यक्रम विपीन मोहिते शाखा संचालक दापोली यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी दापोली तालुका गट शिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे, पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन तसेच दापोली येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक किशोर नागरगोजे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सभासद प्रशिक्षण कार्यक्रम व विदयार्थी गुणगौरव सोहळा घेण्यात आला. दापोली शहरातील राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमास पतसंस्था पदाधिकारी,सभासद,विद्यार्थी, शिक्षक, पालक आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.













