विद्यार्थ्यांनी अभ्यासाला कलेची जोड द्यावी : कल्पेश क्षीरसागर

गडकिल्ले साकारलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान

दोडामार्ग l प्रतिनिधी :   सर्वच क्षेत्रात भरपूर स्पर्धा असल्याने विद्यार्थ्यांनी कष्ट करण्याची तयारी ठेवावी. मन एकाग्र करून अभ्यास करताना अभ्यासाला कलेची जोड द्यावी. तरच आपण निश्चित ध्येय प्राप्त करू शकतो. शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड किल्ल्यांचा अभ्यास करून किल्ले बांधणी दरवर्षी करावी. त्यातून विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी कल्पेश क्षीरसागर यांनी केले.

 

कळणे गावातील लहान मुलांनी दिवाळीनिमित आपल्या अंगणात उस्फूर्तपणे किल्ले साकारलेल्या मुलांना सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी कळणे तंटामुक्ती अध्यक्ष संजय देसाई, बँक अधिकारी विवेक चौधरी, शिक्षणप्रेमी विष्णू नार्वेकर, सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम देसाई, राजेश नार्वेकर आदी उपस्थित होते.

 

यावेळी परी देसाई, ओम देसाई, हर्षली नार्वेकर,आर्या डेगवेकर, उर्वी देसाई, स्नेहल देसाई, मनस्वी देसाई, ओवी देसाई, भैरू देसाई यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

 

सन्मानपत्र व ट्रॉफी ग्रामपंचायत कळणे व बांदा माजी सरपंच बाळा आकेरकर, केदार भिसे यांनी पुरस्कृत केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संदेश देसाई यांनी केले.

————