▪️गोळवण येथे महिला मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
मसुरे | झुंजार पेडणेकर : ग्रामपंचायत कार्यालय गोळवण कुमामे डिकवल येथे आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजने अंतर्गत ग्रामपंचायत मार्फत महिलांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमास वराड गावचे सुपुत्र व मालवण तालुक्यातील प्रसिद्ध ॲड. रुपेश परुळेकर यांनी महिलांना न्याय व्यवस्थे बद्दल माहिती, महिला सुरक्षितता तसेच महिलांचे आरोग्य याबाबत मार्गदर्शन केले. कुटुंब व्यवस्थेमध्ये महिलांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे असे ते म्हणाले.
ग्रामपंचायतीच्या कार्यक्रमामध्ये गावातील प्रत्येक कुटुंबास ग्रामपंचायतमार्फत 15 वा वित्त आयोग निधीतून एक प्लास्टिक घमेले वाटप करण्यात आले. या वेळी ग्रामपंचायत गोळवण – कुमामे – डिकवलचे सरपंच श्री. सुभाष लाड, ग्रा.पं. सदस्य श्री. साबाजी गावडे, ग्रा.पं. सदस्या सौ. मेघा गावडे, ग्रामपंचायत अधिकारी श्रीम. प्रियंका मनवर, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. सदरच्या सभेस गाव मौजे गोळवण, कुमामे व डिकवल मधील 310 ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या बद्दल सर्व ग्रामस्थांचे सरपंच सुभाष लाड यांनी आभार मानले.













