दादासाहेब सरफरे आंतरशालेय कला-क्रीडा महोत्सवाचे शानदार उद्घाटन
देवरूख (प्रतिनिधी)
विद्यार्थी दशेपासून चटके बसण्याची सवय हवी ते सामर्थ्य आत्मसात करुन कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची ताकद निर्माण करणारे संस्कार विद्यार्थ्यांवर अशा महोत्सवातुन होतात. विद्यार्थी बौध्दिक दृष्ट्या सक्षम बनला पाहिजे. त्यांनी अवकाशात झेप घेण्याची स्वप्न पाहिली पाहिजेत. विद्यार्थ्यांची बौद्धिक आणि शारिरीक क्षमता वृध्दिंगत होण्यासाठी आंतरशालेय महोत्सव महत्वपुर्ण भुमिका पार पाडतात असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री रविंद्र माने यांनी केले.
बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था आयोजित शिवने येथील दादासाहेब सरफरे आंतरशालेय कला क्रीडा महोत्सव ते प्रमुख उद्घाटक म्हणुन गुरुवारी बोलत होते. पुढे रविंद्र माने म्हणाले कि प्रत्येकामध्ये दातृत्व गुण निर्माण झाला पाहिजे. मला कोणी तरी मोठे केलय, आता दुसर्याला मोठे करण्याची जबाबदारी माझी आहे. हि भावना वाढीस लागली पाहिजे. खेळताना समोरच्याचा सन्मान करायला शिका. असे सांगताना असे महोत्सव अविरत सुरु राहिले पाहिजेत. बुरंबी संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक करुन राज्यस्तरावर देखील स्पर्धाही घ्या असे शेवटी आवाहन रविंद्र माने यांनी केले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने म्हणाले खर्या अर्थाने विद्यार्थ्यांनी आपल्या कला-क्रीडा गुणांतुन आपली छाप पाडा. या कौशल्यातुन तुम्हाला यशाचे शिखर गाठण्यास मदत होईल.
तुमच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी हि संस्था गेली अनेक वर्षे प्रयत्नशील आहे. संस्थेचा हा स्तुत्य उपक्रम असुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचा चांगला फायदा होत आहे. यातुन कला-क्रीडा संस्कृती जोपासली जात आहे असे शेवटी रोहन बने म्हणाले. प्रास्ताविकात संस्था उपाध्यक्ष विक्रांत जाधव यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप उपाध्यक्ष प्रताप देसाई यांनी केला. कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी आसावरी संसारे, गटशिक्षणाधिकारी विजय परिट, संस्थेचे माजी अध्यक्ष राजाराम गर्दे, सरचिटणीस शरद बाईत, खजिनदार महेश जाधव, सचिव ललित लोटणकर, शाळा समिती अध्यक्ष दिनेश जाधव, संस्था संचालक सचिन मोहिते, शांताराम जाधव, शिवने सरपंच राजु पवार, मुख्याध्यापक प्रकाश विरकर, पर्यवेक्षक महावीर साठे, केंद्र प्रमुख सुरेश बावदाने, तालुका क्रीडा समन्वक अभिजित कदम आदि उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन ध्वजारोहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुहास गेल्ये यांनी केले.












