उपसरपंच नवलराज काळे यांच्या प्रयत्नांना यश
वैभववाडी प्रतिनिधी
माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष सहकार्यातून शिराळे येथे बीएसएनएल टॉवर सुरू झाला आहे. सडुरे – शिराळे ग्रामपंचायतचे उपसरपंच नवलराज काळे यांच्या प्रयत्नाने या टॉवर चे काम मार्गी लागले आहे.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या शिराळ्यासारख्या गावात नेटवरची सोय नसल्याने नवलराज काळे यांनी निवडणुकीच्या काळात शिरयवासीयांना आपण नेटवर्कची सोय करून देऊ असा शब्द दिला होता. त्यानुसार 2023 ला बीएसएनएल टॉवर मंजूर करून घेतला. नैसर्गिक व काही टेक्निकली अडथळ्यांचा सामना करत अखेर टॉवर उभारणी करून तो जनतेच्या सेवेसाठी सज्ज झाला असून निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची उपसरपंच नवलराज काळे यांनी पूर्तता केली आहे.
या टॉवर साठी शिराळे शेळके वाडी येथील बबन शेळके,महेंद्र शेळके, विठ्ठल शेळके, कै.लक्ष्मण शेळके, प्रकाश शेळके यांनी विना मोबदला जमीन उपलब्ध करून दिली. या कामासाठी खांबाळे पंचायत समिती शक्ती केंद्र प्रमुख प्रकाश पाटील, बूथ अध्यक्ष विजय पाटील, माजी सरपंच सखाराम पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रियंका पाटील यांच्या सहित गावातील प्रत्येक ग्रामस्थानी यासाठी सहकार्य केले.











