मसुरे | झुंजार पेडणेकर : मालवणचे तालुक्याचे पोलीस निरीक्षक श्री. मारुती जगताप यांनी आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचे दर्शन घेतले. तसेच जत्रेच्या नियोजनासंदर्भात माहिती घेतली. देवालय परिसराची पाहणी करून ग्रामस्थांसोबत आवश्यक सुरक्षा विषयक करावयाच्या उपाय योजनाची चर्चा केली.
यावेळी आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन काका आंगणे, बाबू आंगणे यांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी काका आंगणे, बाबू आंगणे, पोलीस काँस्टेबल सुरज रेडकर, पोलीस अंमलदार श्री संजय हुंबे, तुषार वाघाटे, पोलीस पाटील पंकज आंगणे, सतीश आंगणे, भरत आंगणे, रुपेश आंगणे, इ. उपस्थित होते.











