वेंगुर्ले : प्रतिनिधी
आधार फाउंडेशन सिंधुदुर्ग या सामाजिक संस्थे मार्फत बुधवार दि.१५ जानेवारी रोजी दुपारी ३ वा.ते सायंकाळी ७ वा. या वेळेत नगरवाचनालय वेंगुर्ले येथे “शिशु /बाल आनंद मेळावा” आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात ६ ते ११ महिने या मधील लहान मुलांची “रांगण्याची स्पर्धा’ (३० फूट ) या विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ३ वर्षाखालील, ३ ते ६ वर्षाखालील मुलांसाठी ‘वेशभूषा स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. प्रत्येक स्पर्धेकाला कमाल २ मिनिटांचा कालावधी असणार. तसेच ६ वर्षावरील व ८ वर्षांखालील मुलासाठी ‘कविता पाठांतर स्पर्धा’ तसेच ८ ते १० वर्षाखालील मुलांसाठी ‘मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धकासाठी ३ मिनिटाचा कालावधी राहील.
कविता पाठांतर स्पर्धा व मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा या दोन्ही स्पर्धा सकाळी १०.३० वा. ते दुपारी १ वा. या वेळेत होणार आहेत. प्रत्येक स्पर्धेतील प्रथम ३ क्रमांकाना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी कोणतीही फी नाही. वेंगुर्ला तालुक्यातील अथवा जिल्ह्यातील कोणीही स्पर्धक सहभागी होऊ शकतो. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी किरण वेंगुर्लेकर, डॉ. वंदन वेंगुर्लेकर, ॲड. नंदन वेंगुर्लेकर ९४२२४३४३५६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आधार फाउंडेशन सिंधुदुर्ग च्या अध्यक्षा श्रीमती माधुरी वेंगुर्लेकर यांनी केले आहे












