बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी ः प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी शहरातील मच्छिमार्केट जवळी आजगावकर कंपाउंड येथे बेशूध्द स्थितीत सापडून आलेल्या वृध्देचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकिय रुग्णालयातील मृत्यू झाला.
सुलभा सुर्यकांत पडवळ (60,रा.आजगावर कंपाउंड मच्छिमार्केट जवळ,रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या वृध्देचे नाव आहे. शनिवार 10 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वा.सुमारास मच्छिमार्केटजवळी आजगावरक कंपाउंड येथे सुलभा पडवळ या बेशूध्द अवस्थेत पडलेल्या मिळून आल्या. तेथील महिलांनी त्यांना रिक्षेतून उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर तेथील अतिदक्षता विभागात उपचार सूरु असताना शुक्रवार 16 जानेवारी रोजी मध्यरात्री 1 वा. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे