बांदा सातोळी बावळाटमार्गे दाणोली मार्गावर पाणी : वाहतुक ठप्प

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यात बुधवारी सकाळपासून मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे बांदा सातोळी बावळाटमार्गे दाणोलीकडे जाणाऱ्या मार्गावर पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत असताना एक बोलेरो रस्त्यालगतच्या गटारात कलंडली. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने हे बोलेरो बाहेर काढण्यात यश आले.