घाडीगावकर समाजाचा वधू-वर परिचय मेळावा 22 फेब्रुवारी रोजी!

मसुरे | झुंजार पेडणेकर : क्षत्रिय मराठा घाडीगावकर सेवा समाज, मुंबई यांच्या व “मध्य मुंबई” विभागाने घाडीगावकर समाजामधील उपवर उपवधू यांच्यासाठी 22 फेब्रुवारी 2026 रोजी सायं. ठीक 4 वाजता सुरेंद्र गावस्कर सभागृह, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, शारदा टॉकीज शेजारी, दादर (पूर्व) मुंबई 14 येथे आयोजित केला आहे. या मेळाव्याच्या वेळी नवीन वधू-वर व त्यांचे पालक यांचा प्रत्यक्ष परिचय करून दिला जातो. तसेच या वधू वर मेळाव्यामध्ये वधू आणि वर यांना प्रत्यक्ष समोरासमोर पाहण्याचा योग मिळत असतो. या मेळाव्यानिमित्त नोंदणी करिता विकास घाडीगावकर 8879771965 व नंदकुमार घाडीगावकर 7045251456 यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे. तरीसुद्धा मेळाव्याच्या दिवशी दुपारी 3 वाजता नाव नोंदणी सुरू होईल. या मेळाव्यासाठी मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, नाशिक व कोल्हापूर या जिल्ह्यातून उपस्थिती असणार आहे. त्यामुळे या मेळाव्याला राज्यस्तरीय मेळाव्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याचा सर्व बांधवांनी लाभ घेऊन उपस्थित राहून सहकार्य करावे असे घाडीगावकर समाजातर्फे आवाहन करण्यात आहे.