परचुरी ग्रामपंचायत उपसरपंचपदी संदीप डाफळे यांची बिनविरोध निवड

गुहागर (प्रतिनिधी): गुहागर तालुक्यातील परचुरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संदीप पांडुरंग डाफळे यांची नुकतीच बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे. संदीप डाफळे हे त्यांच्या सामाजिक कार्यामुळे तालुक्यात परिचयाचे असून, यापूर्वी ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या सक्रिय कार्याची दखल घेत सर्व सदस्यांनी त्यांच्या निवडीला पाठिंबा दर्शवला.

या निवडीच्या वेळी परचुरी ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रतिक्षा भुवड, सदस्य अविनाश गमरे, सदस्या अपेक्षा पवार, अंजली डाफळे, सुविधा भुवड, रसिका भुवड यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी श्री. गोरे उपस्थित होते. तसेच कर्मचारी संजय भुवड, आतिश गमरे आणि श्रद्धा सोलकर यांनीही याप्रसंगी उपस्थित राहून नूतन उपसरपंचांचे अभिनंदन केले. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या संदीप डाफळे यांची उपसरपंचपदी वर्णी लागल्याने गावच्या विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.