कणकवली भाजयुमो तालुका उपाध्यक्षपदी प्रद्युम मुंज ; मंत्री नितेश राणे यांच्याकडून सत्कार

ओम गणेश बंगल्यावर भेट घेऊन घेतले आशीर्वाद; पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा….!

 

 

कणकवली

भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) कणकवली तालुका उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते राजाराम उर्फ प्रद्युम उदय मुंज यांची नुकतीच निवड झाली आहे. या निवडीनंतर शनिवारी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांची कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर भेट घेत त्यांचा आशीर्वाद घेतला.

यावेळी मंत्री नितेश राणे यांनी प्रद्युम मुंज यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले तसेच पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी भाजप कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे, राज नलावडे, भा.सो.मीडिया प्रमुख स्वप्नील वर्दम,भालचंद्र वरवडेकर, बाळू वालावलकर,गोपाल

बागायतकर,जीवन चव्हाण जयेश मुंज आदी उपस्थित होते.