मंडणगड (प्रतिनिधी):मंडणगड तालुका विकास मंडळ( F-1428) मुंबई संचलित राजीव गांधी इंग्लिश मीडियम स्कूल मंडणगड या प्रशालेमध्ये मंगळवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. शेडगे व श्री महाजन यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
मुख्याध्यापक श्री. महाजन व श्री प्रताप जाधव तसेच श्री कुलाबकर यांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनाविषयी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या निमित्ताने या दोन्ही महान नेत्यांविषयी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा तीन गटांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती मिरकर यांनी केले.












