मंडणगड| प्रतिनिधी : पंडीत दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 अंर्तगत भारतीय जनता पार्टी तालुका शाखा मंडणगड यांचे निवासी कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग 4 व 5 एप्रिल 2026 रोजी सरस्वती हॉल धुत्रोली येथे संपन्न झाला. या शिबिराचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष सतिष मोरे, जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, कोकण पदवीधर प्रकोष्ठ सह संयोजक अजय दळवी, तालुका अध्यक्ष दत्ताराम महाडीक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शिबारासाठी तालुक्यातील 125 अधिक कार्यकर्ते उपस्थित होते त्यांची नोंदणी आय.टी. सेल चे यश मेहता व साहिल ताम्हणकर यांनी करुन घेतली. शिबारात जिल्हा उपाध्यक्ष नागेश धाडवे यांनी बुथ व्यवस्थापन व मन कि बात, पक्षाची कार्यपध्दती, माजी तालुका अध्यक्ष सचिन थोरे यांनी भाजपाचा इतिहास, सोशल मिडीया जिल्हा संयोजक वैभव नारकर यांनी सोशल मिडीया ए.आय सरल अँप. नमो अँप, योजना प्रमुख वसंत सुतार यांनी सरकारची कामगिरी सरकारी योजना, कोकण पदवीधर प्रकोष्ठ सह संयोजक अजय दळवी यांनी वैचारीक अधिष्ठान, विनोद राठोड यांनी योग आणि प्रार्थना, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रसाद मांडवकर यांनी कार्य विस्तार, बी.एल.ए-1 जिल्हा उपाध्यक्ष श्रीराम इदाते मतदार यादी विशेष पुर्ननिरिक्षण कार्यक्रम या विषयांवर कार्यकर्त्यांना विविध सत्रात मार्गदर्शन केले. शिबीराचे समारोपास तालुका अध्यक्ष दत्ताराम महाडीक, पदवीधर प्रकोष्ठ सह संयोजक अजय दळवी, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रसाद मांडवकर, श्रीराम इदाते, वसंत सुतार, सचिन थोरे यांची उपस्थिती लाभली. यावेळी मनोगत व्यक्त करताना शिबारातून प्रेरणा घेऊन येत्या काळात तालुक्यातील प्रत्येक बुथवर किमान एक ग्रामपंचायत सदस्य निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरु करणार असल्याचे व पक्षाचे विचार आपल्या नेहमीच्या दैनदीन जीवनात आचरणात आणणार असल्याचे कोकण पदवीधर प्रकोष्ठ संयोजक अजय दळवी यांनी सांगीतले तालुका अध्यक्ष दत्ताराम महाडीक यांनी प्रशिक्षणातून तयार झालेले कार्यकर्ते ग्रामिण भागात पक्ष वाढिसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यान कार्यरत राहणार असल्याचे आभार प्रदर्शनात सांगीतले. वसंत सुतार व सचिन थोरे यांनी शिबिराच सांगता समारंभाचे सुत्रसंचलन केले. शिबिर कार्यक्रम यशस्वी कऱण्यासाठी दत्ताराम महाडीक यांच्या नियोजनखाली आकाश नाविलकर, रामदास भागडे, शैलेश तपकिरे आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.













