जानवळे ग्रामपंचायत मध्ये कायदे विषयक मार्गदर्शन शिबिर तालुका विधी सेवा समिती गुहागरचा उपक्रम

गुहागर प्रतिनिधी:
गुहागर तालुक्यातील जानवळे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तालुका विधी सेवा समिती गुहागर मार्फत
कायदे विषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. या मार्गदर्शन शिबिरामध्ये अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा व लोक अदालत मध्यस्थी या विषयावरती कायदे विषयक माहिती देण्यात आली. या मार्गदर्शन शिबिराध्ये तालुका विधी सेवा समिती गुहागरचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी (वर्ग १, गुहागर) पी.व्ही.कपाडीया साहेब
यांनी अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा व लोक अदालत मध्यस्थी विषयावरती बहुमोल असे मार्गदर्शन केले. तसेच या शिबीरामध्ये पंचायत समितीचे कर्मचारी, जानवळे गावचे सरपंंच जान्हवी विखारे, उपसरपंच वैभवी जानवळकर, ग्रामपंचायत सदस्य मंगेश कोंडविलकर, अनिता जाधव, ग्रामपंचायत अधिकारी गोरख सोनवणे , पोलिस पाटील संतोष जानवळकर, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर , तंटामुक्त समिती अध्यक्ष रमेश नर्बेकर , प्रवीण जाधव, गणेश शिरगावकर, अंगणवाडी सेविका श्रद्धा बेलवलकर, धनश्री जाधव, रिया संसारे,ग्रामपंचायत क्लार्क संजय भगवे, डाटा ऑपरेटर्स स्नेहल जानवळकर तसेच ग्रामस्थ माेठ्या संख्येने उपस्थित होते.