Breaking News मुंबई-गोवा महामार्गावर भरणे नाका येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोघे गंभीर जखमी

खेड (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे नाका येथील रॉयल हॉस्पिटलसमोर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातामुळे काही काळ परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
या अपघातात भरणे नाका येथील राजू कोलगे आणि अनिकेत घडशी हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत जखमींना रस्त्याच्या कडेला सुरक्षित ठिकाणी हलवले.
घटनेची माहिती मिळताच जगद्गुरु रामनंदाचार्य श्री नरेंद्राचार्य जी संस्थान, नाणीज धाम यांच्या 24 तास अपघात मदत सेवेसाठी कार्यरत ॲम्ब्युलन्स तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. ॲम्ब्युलन्स कर्मचाऱ्यांनी जखमींना प्राथमिक उपचार देत पुढील उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
जखमी झालेल्या दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. राजू कोलगे आणि अनिकेत घडशी हे दोघेही भरणे नाका परिसरातील प्रसिद्ध व्यावसायिक म्हणून ओळखले जातात. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.